२१
सप्टेंबर

उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर या छोट्याशा गावात आदिवासी आणि पारधी समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी एक आश्रम चालवला जातो. या आश्रमात पहिली ते दहावीची साधारण पन्नास मुलं राहतात. या मुलांना क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच इतर चांगले संस्कार देता यावेत, वेगळ्या विचारांचा स्पर्श देता यावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रम अंतर्गत या मुलांचे दोन गट करून त्यांना दर आठवड्यात दुवाचे कार्यकर्ते गोष्ट सांगतात, त्यांच्याशी गप्पा मारतात. मुलांना गोष्टी बरोबर मनाचे श्लोक पण शिकवले जातात.

२१
सप्टेंबर

दिव्यांग प्रतिष्ठान चे हरिश्चंद्र सरडे दरवर्षी दिव्यांगांचा सामूहिक विवाहसोहळा आयोजित करून नवविवाहित जोडप्यांना संसार चालू करायला लागणारे सामान मिळालेल्या देणग्यांमधून भेट देतात. या वर्षी दुवा तर्फे या सोहळ्यामाधल्या वधूंना साडी आणि ओढणी देण्यात आले.

२१
सप्टेंबर

ग्रामीण युवकांमधल्या क्रीडा नैपुण्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून नसरापूर येथे बनेश्वर क्रीडा प्रबोधिनी अशा युवक युवतींना क्रीडा प्रशिक्षण देते . या प्रबोधिनीतली मुलं- मुली स्पर्धांमध्येही भाग घेतात. स्पर्धांमध्ये भाग घेताना आवश्यक असे जर्किन्स दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे देण्यात आले

२१
सप्टेंबर

पुण्यातील कर्वेनगर इथल्या ग. रा. पालकर प्रशालेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलामुलींसाठी Good touch , bad touch या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या मुलांना आपल्यावर अन्याय होत असेल, तर तो मुळात समजेल आणि असा अन्याय होत असेल तर त्याला वाचा कशी फोडावी, कोणापुढे, कस बोलावं यासंदर्भात मार्गदर्शनही देण्यात आला. या क्षेत्रातल्या अनुभवी वक्त्या दिपाली सदावर्ते यांनी मुलांना मार्गदर्शन केला.

२१
सप्टेंबर

ऑक्सफर्ड विद्यापीठात नवीन सुरू केलेल्या मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात पुस्तकं संकलित केली गेली. चांगल्या स्थितीत असलेली मराठी बाल साहित्य, ललित साहित्य, कथा, कादंब-या, धार्मिक,ऐतिहासिक, पौराणिक अशी पुस्तक संकलित करण्यात आली. या उपक्रमात दुवा कडून मदत करण्यात आली.

२१
सप्टेंबर

दुवा ने मतिमंद मुलांच्या निवासी शाळेला दिली २४ तास विद्युत प्रवाहाची हमी! या शाळेला inverter च्या दोन batteries "दुवा" तर्फे देण्यात आल्या.

२१
सप्टेंबर

  • हाडशी येथील सूर्योदय फाउंडेशनच्या "आपलं घरट" या कातकरी मुलांच्या आश्रमासाठी गरम कपडे, भांडी, खेळणी पाठवण्यात आली
  • धनकवडे हॉस्पिटल, सातारा रोड येथे 70 दुपटी आणि 35 बेबी सेट देण्यात आली
  • सीपना फाउंडेशन या पानशेत जवळच्या श्री आणि सौ. नारगोळकर निर्मित जंगलात नक्षत्र वन आणि फुलपाखरांसाठी बाग तयार करण्यात येणार आहे. दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे नवीन झाडांची खरेदी , खड्डे करण, झाड लावणं या सर्वांसाठी 20000 रुपये दिले.

सुरुवातीला २ महिला आणि २ उत्पादने (कापडी पिशव्या आणि रेड डॉट बॅग्स) अशा प्रकारे हा उपक्रम सुरु केला होता. आज अडीच वर्षांनी उत्पादनांची संख्या ५० पेक्षा अधिक आहे तर रोजगार लाभलेल्या महिला २ वरून १५ पर्यंत पोचल्या आहेत., ही उत्पादने गरजू महिलांकडून बनवून घेऊन त्यांची यशस्वीपणे विविध प्रदर्शनांमधून व कार्यक्रमांमधून विक्री केली. आपण तयार करत असलेली उत्पादने ही पर्यावरण पूरक असून ती तयार करताना जुन्या वस्तूंचा पुनर्वापर केला जातो. फ्लेक्स चा पुनर्वापर करून बनवलेल्या ग्रो बॅग्स हे एक आवर्जून उल्लेख करावे असे नवीन उतपादन आहे.

शालेय वयातच मुलांना निसर्ग संवर्धनाचे महत्व समजावे म्हणून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने. "दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे" शालेय विद्यार्थ्यांसाठी घरातील टाकाऊ वस्तूंपासून झाडे लावण्यासाठीच्या कुंड्या तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली गेली. पर्यावरणाची जपणूक करताना मुलांच्या सृजनशीलतेलाही अंकुर फुटावा हा उद्देश ठेवला होता. स्पर्धेला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

प्रत्येक महिन्यात दुवा तर्फे जुन्या पण उपयोगी वस्तूंचे संकलन केले जाते. वस्तूंचे योग्य वर्गीकरण करणे आणि त्या वस्तूं योग्य आणि गरजू संस्थांपर्यंत पोचवणे हे अतिशय जिकिरीचे काम दुवा सातत्याने करत आहे. वेगवेगळ्या २६ गरजू सामाजिक संस्थांपर्यंत दुवाने संकलित वस्तू पोहोचवल्या आहेत.







दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे दर वर्षी कर्वेनगर येथील पालकर प्रशालेतल्या इयत्ता 6,7 वी मधल्या कच्च्या विद्यार्थ्यांसाठी सराव वर्ग घेतले जातात. या शैक्षणिक वर्षाच्या सराव वर्गांची सुरुवात जुलै महिन्यात करण्यात आली.

येरवडा भागात राहणारी वैशाली इंगवले ही अनाथ दिव्यांग मुलगी. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक. दिव्यांग असली तरी आपण नातेवाईकांवर भार होऊन जगणं नामंजूर, म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत होती. तिला 'दुवा'ने मदतीचा हात दिला. ' दुवा संकलन संवर्धन केंद्रा'तर्फे तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पिठाची गिरणी भेट देण्यात आली. ज्येष्ठ 'दुवा' सदस्य सौ. सुनंदाताई चव्हाण यांच्या हस्ते गिरणीची पूजा करून ती वैशालीच्या स्वाधीन करण्यात आली. आज ती आत्मनिर्भर होऊन काम करत आहे.

पितृऋण उपक्रमांतर्गत दुवा तर्फे चार वेगवेगळ्या वृद्धाश्रमांना शिधादान करणार करण्यात आले.सर्व देणगीदारांच्या सहकार्यामुळे गरजू वृद्धांना अन्नदान करण्याचे मोठे काम पार पडले.







दुवा उत्पादने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावीत आणि त्यातून दुवासाठी उत्पन्न तयार व्हावे यासाठी दुवा ने विविध प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. सर्व प्रदर्शनांमधून मिळालेला प्रतिसाद हा उत्तम आणि उत्साह वर्धक होता.

लहानपणापासूनच "देणारे" हात तयार व्हावेत यासाठी दुवा आणि आजोळ पाळणाघर यांनी एकत्रित रित्या एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. आजोळ पाळणाघरातल्या प्रत्येक मुलाने आपल्या आईची वापरता येईल अशी एक साडी जमा केली. जमलेल्या सर्व साडया दुवा कडे सुपूर्त केल्या गेल्या. दुवा मार्फत या साड्या ‘स्नेहाधार’आणि ‘स्वामी समर्थ वृद्धाश्रम, मुळशी’या संस्थांना भेट देण्यात आल्या. लहानग्या हातांकडून ही दानदिपाची ज्योत लावली गेली हे या उपक्रमाचे विशेष यश! मकर संक्रांति निमित्त दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे स्वामी समर्थ वृद्धाश्रम, मुळशी येथे तिळगुळ देण्यात आला.

नांदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे घसरगुंडी आणि जंगल जिम भेट देण्यात आले.









दुवाचा दुसरा वर्धापन दिन २०ऑगस्ट रोजी पार पडला. या निमित्ताने दिव्यांग लोकांना आपल्या पायावर उभे करणे, त्यांचे विवाह घडवून आणणे अशा प्रकारचे समाजोपयोगी कार्य करणारे श्री. हरिश्चंद्र सरडे यांना दुवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मागच्या वर्षी दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे विजयमाला कदम प्रशालेमधल्या विद्यार्थिनींना सायकली वापरायला दिल्या होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या परत घेतल्या होत्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मुलींना सायकली परत देण्याचा कार्यक्रम जुलै महिन्यात शाळेत पार पडला.

दुवा संकलन, संवर्धन केंद्राच्या मुकुटात मानाचा तुरा! छबिलदासट्रस्टकडून दुवाला 11000 रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.


पुणे महानगरपालिका आयोजित उपक्रमात दुवा चा सहभाग. घनकचरा व्यवस्थापनाबाबत जागृती करण्यासाठी आयोजित " टाकाऊतून टिकाऊ" प्रदर्शनात महानगरपालिका अधिकाऱ्यांनी टाकाऊ कपड्यांमधून गरजू महिलानी तयार केलेल्या वस्तूंची माहिती घेतली.

२६
सप्टेंबर

नवरात्री निमित्त नऊ दिवस वेगवेगळया ठिकाणी दुवातर्फे गरजू महिलानी बनवलेल्या वस्तूंची विक्री. श्री महालक्ष्मी च्या पूजेबरोबरच सामान्य घरातील या असामान्य महिलांनाही आत्मसन्मान मिळवून देऊन, अनोख्या पद्धतीने " दुवा" ने नवरात्र साजरे केले.

१५
ऑक्टोबर

बाणेर येथील आठवले फूड्स इथे " दुवा संकलन संवर्धन केंद्र" निर्मित वस्तूंचं विक्रीकेंद्र १५ ऑक्टोबर रोजी सुरू झालं. या भागातल्या नागरिकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे

१५
ऑक्टोबर

समाजभान समूहाच्या माध्यमातून खंडाळा येथील अंध वृध्द लोकासाठीच्या आश्रमाला दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे १५ ऑक्टोबर रोजी एक लाख रुपयाची देणगी देण्यात आली.

१६
ऑक्टोबर

१६ ऑक्टोबर रोजी भोर जवळील कारी गावातील वृद्धाश्रमाला समाजभान समूहाच्या माध्यमातून एक लाख रुपयाची देणगी देण्यात आली. या देणगीमधून वृद्धाश्रमाच्या स्वयंपाकघरावर पक्के छप्पर बांधण्यात येणार आहे.

20
ऑक्टोबर

दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे पढारवाडी येथील प्राथमिक शाळेच्या मुलांमध्ये खेळणी आणि स्टेशनरीचे 20ऑक्टोबर रोजी वाटप करण्यात आले. मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या प्राथमिक शाळेच्या मुलांनी या वस्तू गोळा केल्या होत्या. या कामात सातपुते एजुकेशन फाउंडेशन या संस्थेचाही  सहयोग होता

11
डिसेंबर

11 डिसेंबर 2022 रोजी पुण्यामध्ये दिव्यांग प्रतिष्ठान तर्फे 15 दिव्यांगांचा सामूहिक विवाह करण्यात आला या विवाहा प्रित्यर्थ दुवा संकलन संवर्धन केंद्रा तर्फे नवविवाहित जोडप्यांना गृह उपयोगी भांडी आणि कपडे देण्यात आले

15
डिसेंबर

बाणेर येथे 15 डिसेंबर रोजी जुन्या कपड्यांचे संकलन करण्यात आले

15
डिसेंबर

पुण्यातील राजमाता जिजाऊ प्रसूतीगृह या महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहातर्फे तिथे जन्मलेल्या बाळांना झबले, टोपडे, लंगोट याचे सेट द्यायचे होते. मुळशी मधल्या आपल्या काही भगिनींनी ही ऑर्डर अगदी वेळेत पूर्ण करून दिली. त्यामुळे आपोआपच शिराळकर प्रसूती गृह, धनकवडे प्रसूती गृह या महानगरपालिकेच्या इतर प्रसूतीगृहांमधून यांचे २५० हून अधिक सेट पुरवण्याची ऑर्डर मिळाली.

15
डिसेंबर

महिला नुसत्या कमावत्या होऊन उपयोगी नाही तर कमावलेल्या पैशाचं नियोजनही स्वतः करण्यास सक्षम झाल्या पाहिजेत. या उद्देशाने महिला दिनाच्या निमित्ताने यंदा ‘दुवा’ संकलन संवर्धन केंद्रातर्फे ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर अहिल्यादेवी शाळेतील शिक्षिकांसाठी, अहिल्यादेवी शाळेच्या सभागृहात श्रीमती अंकिता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते.

२६
मार्च

२६ मार्च २०२३, गुढीपाडव्याच्या दिवशी दुवाच्या संकलन केंद्राचे स्थलांतर – ‘अबोली’, ना सी. फडके सभागृहाजवळ, सदाशिव पेठ, या ठिकाणी झाले.यासाठी श्री चिंतामणी चितळे यांनी अतिशय मोठ्या मनाने त्यांच्या सदाशिव पेठेतील घरातील जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच आता वस्तूंच्या संकलनासाठी दर महिन्याचा शेवटचा रविवार निश्चित केला आहे. संपर्क : अर्चना फडके, (मोबाईल क्र.)९८८१२४४८७१ ५. त्याचबरोबर दुवाचे नवीन कार्यालय आणि विक्री केंद्र गंगा विष्णू हाईट्स, कर्वेनगर, इथे सुरु झाले आहे. ही जागा धनश्रीताई अभ्यंकर उपलब्ध करून दिली आहे. या दिकाणी दुवा निर्मित वस्तू कायम स्वरूपी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

२६
मार्च

अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्वेनगर येथील ग. रा. पालकर शाळेमध्ये दुवा संकलन संवर्धन केंद्रा तर्फे संचलित सराव वर्ग घेतले जातात. दोन वर्षं ऑनलाईन शिक्षणामुळे मुलं खूप मागे पडली आहेत, पण हळूहळू त्यांना पुन्हा शिक्षणाची गोडी लागावी यासाठी ‘दुवा’ने केलेला हा एक प्रयत्न. हा वर्ग इंग्लिश, शास्त्र आणि गणित या विषयांसाठी ६वी आणि ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला जातो. त्यासाठी ६ स्वयंसेवक काम करतात.







१२
जानेवारी

‘दुवा’ संकलन संवर्धन केंद्राच्या ‘सायकल बँक’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरवात, युवा दिनानिमित्त दि. १२ जानेवारी २०२३ रोजी, सौ. विजयमाला कदम कन्या प्रशाला, पौड रोड, येथे झाली. या शाळेतल्या काही गरजू विद्यार्थिनींना चालत किंवा बसने शाळेत यावे लागते, त्यांना या सायकलींचा मोठा उपयोग होतो आहे. आपल्यापैकी अनेक घरात मात्र जुन्या पण वापरण्यायोग्य सायकली तशाच पडून असतात. अशी घरं आणि अशा गरजू मुली यांचा ‘दुवा’ सांधण्याचं काम ‘दुवा’ने केलं. ११ विद्यार्थिनींना ‘दुवा’ संकलन संवर्धन केंद्रातर्फे या उपक्रमांतर्गत सायकलींचा वाटप करण्यात आला. यातल्या ८ सायकली नव्याने विकत घेतल्या तर ३ जुन्या सायकली संकलित करण्यात आल्या.

२२
ऑक्टोबर

अजून शाळेतही न जाणाऱ्या “आजोळ” पाळणाघरातल्या मुलांनीही आपापला एकेक कपडा आणून दिला. असे ९०० कपडे गोळा करून त्यांनी ‘दुवा’ कडे सुपूर्त केले. सोलापूर जवळच्या “प्रार्थना फौन्डेशन” या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतल्या मुलांसाठी हे कपडे पाठवून देण्यात आले .

 

 

 

 


एप्रिल

दुवा संकलन संवर्धन केंद्रातर्फे पुण्या मधील गोळवलकर विद्यालाय आणि इतर शाळामध्ये शैक्षणिक वर्षा अखेर वह्या मधले कोरे कागद संकलित करण्यात आले. विद्यार्थांनी चांगला प्रतिसाद दिला. या कागद पासून वह्या बनवून मुळशी तालुक्यातल्या नांदगाव, चिखलगाव, कामत वाडी, खालची वाडी, डोंगरगाव आणि साठेसाई या सहा छोट्या गावातल्या शाळांमध्ये या वह्यांच वाटप झालं. एकूण 600 वह्या वाटल्या. या निम्मिताने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत समोर येतील त्या विद्यार्थ्यांसाठी जिवापाड प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांच्या आणि शाळांच्या कार्याची जाणीव दुवाच्या कार्यकर्त्यांना झाली

२२
जून

दुवा संकलन, संवर्धन केंद्रातर्फे नागरिकांना आवाहन करून त्यांच्या कडून फळांच्या बिया गोळा करण्यात आल्या. या बिया माती मध्ये मिसळून त्याचे बीज गोळे तयार करण्यात आले. दिनांक 22 जून रोजी हे बिजागोळे मातीत पेरायचा कार्येक्रम नांदगाव शाळेच्या जवळच्या मोकळ्या जागेत राबवला गेला. फणस, रिठा, जांभूळ, चिंच, सीताफळ अशा वेगवेगळ्या झाडांच्या 375 बिया बीज गोळे स्वरुपात रुजवल्या . नांदगावच्या शाळेत परस बाग करण्यासाठी नियोजन ही सुरू झाले आहे

0२
जून

विविध पर्यावरण संवर्धना मध्ये काम करणाऱ्या संस्था तर्फे दोन जुने ला इको जत्रा हा उपक्रम आयोजित केला होता. दुवा संकलन, संवर्धन केंद्र ने इथ संस्थे च्या उत्पादनांच्या प्रसिद्धी आणि विक्री करता स्टाल लावला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला

 

 


जुलै

दुवा च्या माध्यमातून कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमधील फॅशन डिझाइनिंग च्या चार विद्यार्थिनींची तीन वर्षाच्या कोर्स ची फी दुवा संस्थे तर्फे भरली होती . त्या चारही विद्यार्थिनी सर्वोच्च श्रेणी मध्ये पास झाल्या .त्या मधली एक विद्यार्थिनी, सारिका, कॉलेजमध्ये दुसरी आली.

 


जुलै

ग रा पालकर शाळेतील मुलांकरता दुवा सातत्याने दर वर्षी सराव वर्ग घेते. या सराव वर्गात इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी ,गणित आणि शास्त्र विषय शिकविले जातात. अभ्यासात मागे पडलेल्या मुलांना संकल्पना समजण्यास मदत करून त्यांच्या मध्ये शिक्षणा बद्दल आणि स्वता बद्दल आत्मविश्वास निर्माण करणे हा या वर्गांचा मुख्य उद्देश आहे. यावर्षी संध्याताई कानेटकर, अनघा जोशी ,सोनल जोशी, राधिका कानेटकर पराग जोगळेकर आणि विनायक गोगटे हे सराव वर्ग घेणार आहेत.

 

२३
जुलै

२३ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र टाइएम्स चे माजी संपादक अशोक पानवलकर यांचा दुवाच्या कार्याचा आढावा घेणारा लेख प्रसिद्ध झाला. या लेखा मध्ये दुवाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेऊन दुवा बद्दल गौरव उद्गार काढले आहेत.

 

२३
जुलै

दुवा तर्फे कपड्यांचा पुर्नवापर करून अनेक उपयोगी वस्तू बनवल्या जातात. या वस्तूंच्या प्रसार आणि विक्री करता विविध ठिकाणी प्रदर्शांत सहभाग घेतला जातो. दुवाने या कालावधीत खालील ठिकाणी स्टोल लावले.. या स्टोलना चांगला प्रतिसाद मिळाला.

  • स्नेह प्यारडाइस (१०-११ ऑगस्ट)
  • महेश विद्यालाय (३०,३१ ऑगस्ट ,1 सप्टेंबर)
  • ज्ञानाल कार्यालय ( ३१ ऑगस्ट , 1 सप्टेंबर)

 

२१
ऑगस्ट

दुवाच तिसरा वर्धापन दिन अतिशय उत्साहाने २१ ऑगस्ट रोजी छत्रे सभागृहां मध्ये पार पडला. दुर्गम आदिवासी भागात अनेक वर्ष अविरत काम करणाऱ्या गोडबोले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या आणि गरीब, अनाथ , दिव्याग यांच्या करता काम करणारे सचिन गायकवाड हे या वर्षीचे दुवा पुरस्काराचे मानकरी होते

दीप प्रज्वलनानी कार्यक्रमाची सुरुवात झाली. दुवा च्या विविध वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांचा सत्कार करण्यात आला. तसेच दुवाने मदत केलेल्या कर्वे शिक्षण संस्थेच्या fashion design या पदवी मध्ये यशस्वी विद्यार्थिनींचा या संस्थेच्या प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

२१
ऑगस्ट

मुलांना शाळेत येण्यास मदत व्हावी म्हणून दुवा गेले काही वर्ष सायकल बँक उपक्रम चालवत आहे. या अंतर्गत दर वर्षी शालेय वर्षाच्या सुरवातीस मुलांना सायकली वापरण्यास दिल्या जातात आणि शालेय वर्ष संपताना या जमा केल्या जातात. या वर्षी सेवा भारती या संस्थेच्या सहयोगाने ज्ञानदा प्रशालेतील गरजू मुलांना काल १० सायकली देण्यात आल्या

२१
ऑगस्ट

विभूती साळवी या युवतीने स्वतःचं बुटीक सुरू करावं हे स्वप्न उराशी धरून फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला आणि कर्वेनगर येथे जागा भाड्याने घेऊन अलंकृत या नावाचा स्वतःचं बुटीक सुरू केलं.! या कोर्स च्या फी करता आणि बुटिक उभारण्या करता दुवाने तिला आर्थिक पाठबळ दिलं. दुवा च्या मदतीने या युवतीचे स्वप्न पूर्ण झाला.

२१
ऑगस्ट

पितृऋण उपक्रमांतर्गत वृद्धांसाठी जमा झालेल्या निधीमधूनखालील तीन वृद्धाश्रमांना शिधादान केले. सर्व वृद्धाश्रमांना त्यांच्या गरजेनुसार कमी जास्त शिधा दिला आहे.

  • पुणे येथील आनंदाश्रम (8788882602)
  • कारी येथील कुंजबन वृद्धाश्रम (99850812528)
  • पौड येथील स्वामीनिवास वृद्धाश्रम (917498809495)

माहिती आणि शिक्षण या करता जमा झालेल्या निधी मधून

  • MSW करणार्या एका गरजू विद्यार्थिनीची fee भरण्यात आली.
  • एक विद्यार्थिनी पोलीस भरती प्रशिक्षण घेते आहे. त्या पोलीस अकॅडमीची fee देण्यात आली
  • गरजू विद्यार्थ्या करता स्पोकन इंग्लिश च्या क्लास सुरु करण्यात येणार आहे
२१
सप्टेंबर

दुवा तर्फे कपड्यांचा पुर्नवापर करून अनेक उपयोगी वस्तू बनवल्या जातात. या वस्तूंच्या प्रसार आणि विक्री करता विविध ठिकाणी प्रदर्शांत सहभाग घेतला जातो. दुवाने या कालावधीत खालील ठिकाणी स्टोल लावले.. या स्टोलना चांगला प्रतिसाद मिळाला.

  • प्रशांत सभागृह २१-२२ सप्टेंबर
  • शुभंकर सभागृह ४-६ ऑक्टोबर
  • सेवासदन शाळा – २७ ऑक्टोबर
  • आयडियल कॉलोनी – २७ ऑक्टोबर

 

 

 

२१
सप्टेंबर

दुवाच्या मदतीने एका सहृद कुटुंबां कडे असलेली सायकल गरजू विद्यार्थिनी ला देण्यात आली

 

 

 

 

 

 

 

२१
सप्टेंबर

अत्यंत कमी जागेत, सोप्या पद्धतीने घरगुती कंपोस्टिंग करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि मार्गदर्शन गृहसंस्था ना मोफत देण्यात आला आहे

२१
सप्टेंबर

दिवाळीनिमित्त परिसर, घर स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि नैसर्गिक जीवनशैलीच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याच्या उद्देशाने दुवा तर्फे स्नेहल गोखले यांची खालील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले

  • bio enzyme बनवण्याची प्रक्रिया
  • घरातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती

या प्रकल्पा अंतर्गत भुईणी गावातील एका वस्तीतील 40 रहिवाशांना 'सेवा भारती' च्या माध्यमातून दिवाळीनिमित्त आंघोळीचे आणि भांडी घासायचे साबण भेट दिले

२१
सप्टेंबर

स्टेशनरी आणि खेळणी गरजू मुलांना दिवाळी निमित्त भेट देण्याकरता पूर्व प्राथमिक शाळेमधल्या छोट्या मुलींनी या वस्तू गोळा करून दुवा कडे सुपूर्त केल्या.

२१
सप्टेंबर

दुवा च्या कारागीरांपेकी एकीच मशीन बंद पडला होता. दुवा च्या एक कार्यकर्तीनी त्यांच्याकडे] चालू स्थिती मध्ये असलेला मशीन या कारागीर ताईना भेट दिला.

२१
सप्टेंबर

देणे आनंदाचे- समाजासाठी" या उपक्रमांतर्गत कोथरूड येथील आयडियल कॉलनी इथले रहिवासी गेले नऊ वर्ष देणगी गोळा करून एखाद्या सामाजिक संस्थेला देतात. या ही दुवा संकलन संवर्धन केंद्राला देण्यात आली. दुवा वरच्या विश्वासाची ही आणखीन एक पोचपावती